भोळेपणाचा आव आणणाऱ्या जिल्ह्यातील त्या पुढाऱ्यांना खासदार विखेंनी दिला इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- भोळेपणाचा आव आणत जिल्ह्यातील काही पुढारी मंडळी केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामाचा दिखावा करत आहे. स्वतःचे सोडून दुसऱ्यांच्या मतदार संघात ढवळाढवळ करत आहे.

याच अनुषंगाने खासदार विखे पाटील यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांची खिल्ली उडवत त्यांचा पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील काही नेतेमंडळी दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

असेच चालू राहिल्यास मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,” असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

त्यामुळे काॅंग्रेसचे राज्यातील नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेत नुकतेच पक्षांतर झालेले मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख,

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे भाचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना विखेंनी धारेवर धरले असल्याचे चित्र त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे.

दरम्यान विखे पाटील यांनी सत्ताधारी तिनही पक्षांवर सोडलेल्या टिकास्त्रामुळे नवा वाद उद्भवणार आहे. नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन टाकळी काझी येथे काल डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के आदी उपस्थित होते.

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप असे चित्र सध्या राज्यात तयार झाले आहे. नगर जिल्ह्यातून भाजपच्या वतीने

विखे पाटील पितापुत्र सत्ताधाऱ्यांना विरोध करतात. इतर नेते मात्र शांत आहेत. आता खासदार विखे पाटील यांनी तिनही मंत्र्यांवर आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24