महावितरणचा विजेचा शेतकऱ्याला शॉक; साडेतीन एकर ऊस झाला खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यातच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याचा साडेतीन एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झाला आहे.

उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून हा ऊस जळून खाक झाला आहे. संगमनेर तालुक्‍यातील कनोली येथे हि घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,: कनोली शिवारात गोरखनाथ, रोहिदास व रावजी काशिनाथ वर्पे यांच्या मालकीच्या जमिनीत वीज वितरण कंपनीच्या मुख्य वीजवाहिनीच्या तारा गेल्या आहेत.

या तारांमध्ये झोळ पडल्याने, त्या एकमेकींना चिकटल्या. शॉर्टसर्किट होऊन त्यातून आगीचे लोळ तोडणीला आलेल्या उसावर पडून उसाने पेट घेतला. या आगीत साडेतीन एकर ऊस जाळून खाक झाला आहे.

आगीची माहिती समजताच आसपासच्या अनेकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. युवकांनी ४० एकर ऊस वाचविला. मात्र, या दरम्यान साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याने, या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या वीजवाहक तारांमुळे याआधीही अशा घटना घडलेल्या आहेत. वीज वितरण कंपनीने याची दखल घ्यावी. व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24