मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीमध्ये ‘इतकी’झाली वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अलिबाबाचे संस्थापक जैक मा यांनाही त्यांनी मागे पाडले आहे.

अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकमधील भागीदारीनंतर अंबानी यांनी हा पल्ला गाठला आहे.

फेसबुकशी झालेल्या डील नंतर अंबानींची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सने वाढून 49.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.77 लाख कोटी रुपये) झाली आहे. मुकेश अंबानीच्या जिओमध्ये फेसबुक 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

या गुंतवणूकीनंतर जिओमधील फेसबुकची भागीदारी 9.99% पर्यंत वाढणार आहे. मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक जॅक मा यांना मागे ठेवले आहे.

अंबानी यांची संपत्ती जॅक माच्या संपत्तीपेक्षा 3.5 अब्ज डॉलर्सने जास्त आहे.ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, 21 एप्रिलपर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 14 अब्ज डॉलर्सवर गेली. तर जॅक मा यांचीसंपत्ती 1 अब्ज डॉलर्सने कमी झाली.

फेसबुकशी झालेल्या कराराच्या बातमीनंतर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने प्रचंड उसळी घेतली.एका वेळी तो 11 टक्क्यांनी वाढून 1375 रुपयांवर गेला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24