मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चारच दिवसांपूर्वी बंड करून भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
पण काही तासातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं बंड मोडून काढल्याने उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी फडणवीस सरकार पाडलं होतं.
या बंडामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीने गटनेतेपदावरुन हकालपट्टीही केली होती. आणि त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांची नेमणूक केली होती.
त्यामुळे जयंत पाटील हेच उपमुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की, अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा पत्ता सध्या तरी कट करण्यात आला आहे.
पण आता एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाविकास आघीड सरकारमध्ये अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हेच राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत. पण ते आज शपथ घेणार नाहीत.’ यामुळे आता जयंत पाटील यांचं उपमुख्यमंत्री निश्चित नसल्याचं समोर येत आहे.