अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी असल्याने एकच खळबळ उडाली. फोन करणाऱ्या व्यक्तीने जामनगरमधून बोलत असल्याचे सांगितले.
दरम्यान यानंतर ताबडतोब महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करुन संबंधित घटनेची तक्रार दिली आहे.
फोन करणारा जामनगरमधून बोलतोय असे सतत बोलत होता. फोन उचलल्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोलायला सुरुवात केली तसेच अश्लील शिव्या दिल्या.
तसेच पोलिसांना सांगितल तर मारुन टाकेन असे धमकी दिली,असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली आहे.