महाराष्ट्र

Mumbai Mhada Lottery: म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा तर सोबत ठेवा ‘ही’ कागदपत्रे! नाहीतर अर्ज होईल बाद

Published by
Ahmednagarlive24 Office

Mumbai Mhada Lottery:- मुंबई व पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता अनेक जण प्रयत्न करत असतात. परंतु घरांच्या किंवा जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही.

अनुषंगाने जर बघितले तर आपल्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात.

अगदी याच पद्धतीने म्हाडाच्या माध्यमातून सध्या 2030 सदनिकांसाठीची सोडत जाहीर करण्यात आली असून नऊ ऑगस्ट पासून त्याची नोंदणी देखील सुरू झालेली आहे.

साहजिकच या लॉटरीकरिता इच्छुकांना अर्ज दाखल करणे गरजेचे असते व अर्ज दाखल करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता देखील असते. यामध्ये जर कागदपत्रे अपूर्ण राहिले तर ऐन वेळेला धावपळ होते किंवा केलेला अर्ज बाद देखील होऊ शकतो. म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांची यादीच म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेली आहे.

म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा तर लागतील ही कागदपत्रे

1- अर्जदार हा विवाहित असेल तर पती/ पत्नी यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड

2- अर्जदार जर अविवाहित असेल तर स्वतःचे आधार कार्ड/ पॅन कार्ड

3- अर्जदार घटस्फोटीत असेल तर सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत( यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की अंतिम निकालाची प्रत मिळाल्याशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही.) आवश्यक आहे. डिक्रि प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही.

3- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सलग २० वर्षाच्या कालावधीत अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागांमध्ये किमान पंधरा वर्षे त्याचे वास्तव्य असावे व त्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्रातील आधिवासाचे प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट दिलेले असावे. ( हे आधीवास प्रमाणपत्र जानेवारी 2018 नंतर दिलेली असावे व त्यावर बारकोड देखील असणे गरजेचे आहे.

4- समजा अर्जदार विवाहित असेल तर पती/ पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे दिनांक एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 मधील आयकर विवरण पत्र किंवा कुटुंबाचा दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यानचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो.

5- समजा अर्जदार अविवाहित असेल अथवा पती/ पत्नी पैकी एकाचे उत्पन्न असेल तर उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दिनांक एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2023 मधील आयकर विवरण पत्र अथवा याच कालावधीतील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे गरजेचे आहे. समजा यामध्ये जर चुकीचे उत्पन्न सादर केले असेल असे निदर्शनास झाले तर सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येऊ शकते.

( टीप- अर्जदारांनी म्हाडाच्या लॉटरी करिता अर्ज करताना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरच करावा किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार करण्याअगोदर व्यवस्थित चौकशी करून पाऊल उचलावे व स्वतःचा आर्थिक फसवणुकीपासून बचाव करावा.)

Ahmednagarlive24 Office