गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना बुधवारी मुंबईच्या काही भागांत पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काहीसा दिलासा दिला. सकाळी ढगाळ वातावरण निर्माण करीत पावसाने हजेरी लावली.
सायन,दादर, कांदिवली, विक्रोळी, मागाठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर या भागांमध्ये सकाळी ७ ते ८ या दरम्यान काही ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नोकरी निमित्ताने घराबाहेर पडलेले मुंबईकर हैराण आहेत
आठवडाभरात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बुधवारी मुंबईच्या काही भागांत ढगाळ वातावरण करीत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहिसा गारवा निर्माण जाणवला. त्यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेले मुंबईकर काहीसे सुखावले.
दादर, कांदिवली, मागाठाणे, ओशिवरा, वडाळा, घाटकोपर या शहरातील अनेक भागांमध्ये सकाळी ७ ते ८ या वेळेत ४ मिमी ते २६ मिमी पावसाची नोंद झाली, दादर, सायन, वडाळा, विक्रोळी, घाटकोपर या भागात चांगला पाऊस झाला,
तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईतही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. त्यामुळे काही वेळ वातावरणात गारवा जाणवला. पण दुपारी चारानंतर पुन्हा उन्हाची काहिली सुरू झाली, उष्मा आणि आर्द्रतेमुळे मुंबईकर हैराण झाले.