ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी थाटामाटात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या नवीन सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.  

आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही आज आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत.

सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्येच आहेत. त्यामुळे त्यांना लवकर मोकळे करता यावे. यासाठी शनिवारीच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा नवीन सरकार प्रयत्नात आहे.
दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्श ठराव मांडण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्या म्हणजेच शनिवारीच विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
सर्व आमदारांचा 27 तारखेला शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. ही प्रक्रिया शनिवारी पू्र्ण होऊ शकते.
अहमदनगर लाईव्ह 24