मुंबईच्या तरुणाने दिली मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- मुख्यमंत्री योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

8828453350 या क्रमांकावरून गुरुवारी रात्री 12.32 वाजता उत्तर प्रदेश 112 हेल्प डेस्कच्या 7570000100 या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला.

पोलिसांनी तातडीने चौकशी करत धमकी देणाऱ्यास अटक केली आहे. कमरान अमीन खान (वय 25) असं आरोपीचं नाव आहे. हा आरोपी मुंबईतल्या चुनाभट्टी इथं तो राहणारा असून गुन्ह्याची त्याने कबुलीही दिली आहे.

ज्या नंबरवरून फोन आला त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याची माहिती घेत मुंबई पोलिसांना कळवलं. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याचा माग काढला आणि गुप्त माहिती गोळा केली.

त्यानंतर त्या तरुणाला अटक करण्यात आली. ‘मुख्यमंत्री योगी यांना मी बॉम्बने उडवणार आहे,’ अशी धमकी देत एका विशेष समुदायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शत्रू बनले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटलं होते.

या प्रकरणी गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये कलम 505(1)b 506,आणि 507नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

 

अहमदनगर लाईव्ह 24