Maharashtra News : ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा बावर अधिक दिसून येत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने एका पत्रान्वये नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटी येथे भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेला नागरिकांना “जेलीफिशने देश’ केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्यव्यवसाय विभागाने महानगरपालिकेला केली आहे.
या कालावधीत नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करतानाच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजनांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील नागरिकांच्या आयोगाच्या दुष्टी प्राधान्य देतात जेलीफिश दंश’ किंवा ‘स्टिंग रे’ दंश केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना महानगरपालिकेचे आयुक्त चहल यांनी दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने विभाग पातळीवर उपाययोजना करण्याच्या सचना देण्यात आल्या आहेत तसेच याबाबत समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश डी. जी उत्तर, के-पश्चिम, पी-उत्तर आणि आर-मध्य वा विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याअनुषंगाने चौपाट्यांवर असणाऱ्या बाँच टॉवरवरून नागरिकांना मेगाफोनवरून सूचना देणे, नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, अशा आशयाचे फलक प्रदर्शित करणे, तसेच चौपाटीवर फिरताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करणे अशा प्रकारच्या उपाययोजना संबंधित विभाग कार्यालयाद्वारे करण्यात आल्या आहेत.
एखाद्या नागरिकास मत्स्ववंश झाल्यास पुढील काळजी घ्यावे, अशी माहिती मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ दक्षा शहा यांनी दिली आहे. तसेच मत्स्यदेश झाल्यास प्रथमोपचार करणारे पथकही सज्ज असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले.
समुद्रकिनारी काय काळजी घ्याल?
नागरिकांनी समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जाऊ नये, तसेच पाण्यामध्ये जावयाचे झाल्यास ‘गमबूट वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये जाऊ न देण्याची खबरदारी घ्यावी. माशांनी दंश केल्यास घाबरून न जाता त्वरित महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात त्वरित संपर्क साधावा. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
‘स्टिंग रे’चा दंश झाल्यास काय करावे
‘स्टिंग रे’चा दंश झाल्यास, नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते. जेलीफिशचा वंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका, जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा, जखम झालेल्या जागी बर्फ लावावा. स्टिंग रे किया जेलीफिशचा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.