अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती.
सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले.
मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे कामगार युनियनने आठवडाभरापूर्वी ‘वर्क फ्राॅम होम’ची संकल्पना महापाैर बाबासाहेब वाकळे यांच्यासमोर मांडली.
त्यानंतर मनपाने पत्रक जारी करून नागरिकांना कार्यालयात न येण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठवडाभरापासून ‘वर्क फ्राॅम होम’ करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना मिळाली.
अत्यावश्यक सेवा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. कार्यालयात नागरिक, ठेकेदारांना प्रवेश बंद करावा व ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करावे, अशी मागणी युनियनच्या वतीने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved