कुऱ्हाडीचे घाव घालत मुलाकडून वडिलांची हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नाशिक :- वडिलांपासून वेगळे राहणाऱ्या विवाहित मुलाने पत्नी आपल्या वडिलांकडे निघून गेल्याने तिला मारहाण करण्यासाठी गेल्यावर वडील भांडण सोडवण्यास आल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांना ठार केल्याची घटना निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली.याप्रकरणी निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

बबन निवृत्ती निरभवणे असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कमलेश निरभवणे यांनी फिर्याद दिली आहे.बबनच्या घराशेजारीच वडील निवृत्ती निरभवणे (७३) व आई फुलाबाई निरभवणे हे विभक्त राहतात.

बबन निरभवणे व त्याची पत्नी सरला यांच्यात १५ दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. बबन याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे पत्नी मुलांना घेऊन सासरे निवृत्ती निरभवणे यांच्या घरी राहायला आली होती. सोमवारी बबन वडिलांच्या घरी कुऱ्हाड घेऊन आला.

पत्नी सरलाला शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न करत असताना वडिलांनी काठी घेऊन त्याला घराबाहेर हाकलले. याचा राग येऊन बबन याने आई, पत्नी व मुलांसमोर वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्यांना जागेवरच ठार केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24