रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ,आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा नगर पुणे महामार्गावर जातेगांव घाटात तलवारीने वार करून निर्घुन खुन करण्यात आला. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.

जरे या सोमवारी कामानिमित्त पुणे येथे गेल्या होत्या. पुणे येथून कारने नगरकडे येत असताना जातेगाव फाटा नजिक मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले.

यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीरित्या जखमी झालेल्या जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दखल केले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24