अहमदनगर Live24 ,31 मे 2020 : चंद्रपूर शहरातील महाकाली वार्ड या कोळसा कामगारांची वस्ती असलेल्या भागात एका पोलीस उपनिरीक्षकावर दारू तस्करांनी हल्ला करत गंभीर जखमी केले.
त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे यांना महाकाली वार्ड परिसरातील अमित गुप्ता नामक दारू तस्कर दारूची आणणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार काही कर्मचारी सोबत घेत पोलीस उपनिरीक्षकांनी परिसर गाठत दारू तस्करांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान गुप्ताने चकमा देत स्वतःचे घर गाठले.
पोलिसांनी त्याला घरी गाठून त्याच्याकडील चार पेट्या देशी दारू जप्त केली. दरम्यान कारवाईसाठी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन निघत असताना अमित गुप्ता व कुटुंबियांनी पोलीस उपनिरीक्षक जीवन लाकडे याच्यावर हल्ला करत त्यांना जबर जखमी केले.
या हल्ल्यात लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान लगेच घटनास्थळी अधिक पोलिस कुमक बोलावून शहर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविली गेली.
सध्या या प्रकरणात आरोपी फरार आहेत. दारू तस्करांनी पोलिस पथकावर हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात सतत सुरू असून यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी ची स्थिती मात्र स्पष्ट पणे पुढे आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews