अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगितकार, ऑस्कर विजेता ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. चेन्नईत त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
याबाबत रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या.
प्रत्येक खास प्रसंगी रहमान आपल्या आईचा उल्लेख करत असतात. आपल्या आईनेच आपल्यातले संगीत आणि आपले कलागुण ओळखले, असे रहमान नेहमी म्हणत.
स्वतःच्या संपूर्ण यशाचं श्रेय त्यांनी करीमा बेगम यांना दिलं होतं. दरम्यान, वडील व संगीतकार आर.के.शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं.
वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असं रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.