अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- फासा आम्हीच पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू असं विधान करत राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना राज्यात सत्तांतराचे संकेत दिले.
तर यावर प्रतिक्रीया देतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना माझ्या शुभेच्छा, असे म्हणत यावर अधिक भाष्य करणे टाळले. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आहे.
तर भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, मात्र फासा आम्हीच पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. त्यामुळे पलटवलेला फासा खूप मोठा असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेसने कुणाला अध्यक्ष करावे व कुणाला नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र सध्या देशात काँग्रेसच उरली नाही, असा फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला.
तसेच मंत्री यशोमती ठाकुर यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. घटनात्मकरित्या मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख नाहीत तर राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यपालांबद्दल बोलताना जपून बोललं पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री यशोमती ठाकुर यांना दिला.