माझ्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,11 जून 2020 :   पतीने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची फिर्याद बायकोनेच दाखल केल्यामुळे नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.पती,सासू,सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध बाल विवाह प्रतिबंधित कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेवासा पोलीस स्टेशनला संगिता माहदु खेमनर ( वय 30 वर्षे) रा साकुर ता संगमनेर(हल्ली अमळनेर ता.नेवासा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अमळनेर तालुका नेवासा येथे आई/वडील,भाऊ,भावजई यांचेसह एकत्र राहते.

तिचे लग्न माहदु खंडु खेमनर रा.साकुर जांभळवाडी ता .संगमनेर याचेशी 24 मार्च 2008 रोजी अमळनेर येथे झाले आहे.लग्नानंतर सुमारे 2 वर्ष नवरा व सासरच्यांनी व्यवस्थीत नांदविले.

त्यानंतर सासरचे लोकांनी घरातील किरकोळ कामाचे कारणावरुन त्रास देण्यास सुरवात केली.नंतर तर नवरा नेहमी कोणत्याही ,कारणावरुन मारहाण करीत असे.

सासु-सासरे व दिर त्यांना प्रोत्साहन देत होते. तसेच फिर्यादीला कधी कधी उपाशी पोटी ठेवु लागले.अखेर वडील रामदास सोन्याबापु बाचकर रा.अमळनेर,ता.नेवासा हे तिला माहेरी घेवुन आले.

तेव्हा पासुन मी वडीलांकडे माहेरी राहत आहे. दरम्यान दि.26 मे 2020 रोजी फिर्यादी महिलेचा पती माहदु खंडु खेमनर याने खुपटी येथे महादेव मंदीरात दुपारी 2 वाजता एका अल्पवयीन मुलीशी लग्न लावले आहे असे समजले आहे.

त्यामुळेच संगनमताने सदरचे लग्न सासरा खंडु बायजी खेमनर,सासु गंगुबाई खंडु खेमनर,भाया रख्मा खंडु खेमनर, जालिंदर खंडु खेमनर (सर्व रा.साकुर जांभुळवाडी ता.संगमनेर) पतीचे यांचे मामा धोंडीबा लक्ष्मण पुणेकर ( रा.डिग्रस ता संगमनेर)

व मुलीचे आई,वडील व मामा या सर्वांनी एकत्र येवुन हे लग्न लावले असल्याने या सर्वाविरुद्ध कायदेशीर फिर्याद नोदवली आहे. याबाबत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसून पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर देवकाते हे करीत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24