अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :सध्या कोरोनाच्या आजारामुळे सर्व नागरिक धास्तावले आहेत. विशेषतः या काळामध्ये प्रेग्नसीमध्ये असणाऱ्या महिलांमध्ये गुंतागुंतीचे प्रकार वाढले.
त्यामुळे फैलावाच्या काळात गर्भधारणा झाल्यास काही आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होईल का, अशी भीती अनेक दाम्पत्यांना सतावत असल्याचे निरीक्षण प्रसूतितज्ज्ञांनी नोंदविले आहे. यापासून दूर राहायचे असल्यास गर्भनिरोधकांचा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
करोनाचा संसर्ग पसरल्याने लॉकडाउन लागू करण्यात आल्याने अनेक नागरिक घरीच आहेत. अशा काळात जगभरात अनपेक्षित ७० लाखांहून अधिक प्रसूती होण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नुकताच मांडण्यात आला आहे.
मात्र, या काळात गर्भधारणा झाली तर आई किंवा बाळाला करोनाची लागण होण्याची किंवा आरोग्यावर अन्य परिणाम होण्याची चिंता अनेक दाम्पत्यांना सतावू लागली आहे. अनेकांनी याबाबत सल्ल्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे धाव घेतली आहे.
करोनाच्या संसर्गामुळे सध्या सुरक्षित वावराचे नियम पाळावे लागत आहेत. मात्र, त्याचे उल्लंघन झाल्यास गर्भवती महिला आणि तिच्या गर्भावर परिणाम होण्याची भीती या दाम्पत्यांच्या मनात आहे.
मात्र, काही ठिकाणी गर्भनिरोधक औषधे उपलब्ध होत नसल्याने नको असतानाही गर्भधारणेची परिस्थिती उद्भवत आहे. लॉकडाउनमुळे आयव्हीएफ क्लिनिकने सर्व प्रक्रिया थांबविण्याचे कठोर पाऊल उचलले आहे.
आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या उपचारांमध्ये अडथळा आला आहे,’ याकडे नोव्हा आयव्हीएफ सेंटरच्या वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉ. निशा पानसरे यांनी लक्ष वेधले.
‘करोना संसर्गाच्या काळात गर्भधारणेबाबत अनेक दाम्पत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनपेक्षित गर्भधारणा झाली, तर गर्भपात करण्याकडे अनेक दाम्पत्यांचा कल दिसत आहे.
असे असले तरीही गर्भपाताची प्रक्रियाही गुंतागुतीची आहे. त्यामुळे गर्भधारणा नको असल्यास गर्भनिरोधकांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews