नागपूर ;- येथील तयार कापडाच्या दुकानातील चेंजिंग रूममध्ये मोबाइल फोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण होत असल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. शालेय विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानमालक आणि नोकराला अटक केली आहे.
दोन विद्यार्थिनी गणवेश खरेदी करण्यासाठी फ्रेंड्स कापड शोरूममध्ये गेल्या होत्या. गणवेश घालून पाहण्यासाठी मुलींना दुसऱ्या माळ्यावरील चेंजिंग रूममध्ये पाठवले गेले. मुलींना रूममध्ये लपवून ठेवलेला मोबाइल हँडसेट आढळून आला.
हँडसेटची तपासणी केल्यावर त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंगही सुरू होते. मुलींनी धाडस दाखवून सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चेंजिंग रूमची पाहणी करून दुकानमालक अग्रवाल आणि नोकर निखिल चौथमल या दोघांना अटक केली.