अहमदनगर :- गेल्या २५ ते ३० वर्षांपासून नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेकडे आहे. पाच वेळा शिवसेनेचे आमदार शहरात निवडून गेले, परंतु शहराचा कुठलाही विकास होऊ शकलेला नाही.
नगर शहराच्या पाठीमागून नाशिक, औरंगाबाद, पुणे या शहरांचा झपाट्याने विकास होऊन ती शहरे महानगरे म्हणून पुढे आली आहेत, नगर शहर आजही मागासलेले आहे.
हे चित्र बदलण्यासाठी शहर विधानसभेची जागा भाजपाकडे घेण्यात यावी अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सतिश शिंदे यांनी केली आहे.
याबाबत युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपाकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.
नगर शहराचा विकास खुटल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तरुणांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तरुणांना दुस-या शहरांमध्ये जावे लागत आहे.
ही वेळ नगरकरांवर केवळ अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे आलेली आहे. विकासाची दृष्टी भारतीय जनता पार्टीकडेच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ज्या पद्धतीने काम चालवले आहे त्यामुळे जनतेला भाजपाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत.
नगर शहरातील नागरिकांनाही शहराचा सर्वांगीण विकास व्हावा ही अपेक्षा आहे. आणि विकास फक्त भाजपाच करू शकते असा विश्वासही नगरकरांना वाटत आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाच्या युतीच्या जागा वाटपात नगर शहर विधानसभेची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपाकडे घेण्यात यावी
अशी सर्व भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकत्यांची मागणी आहे. शहरात भाजपाचा आमदार झाल्यास शहर विकासाला चालना मिळणार आहे.
याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची आणि प्रदेश भाजपा नेत्यांची समक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सतिश शिंदे यांनी सांगितले.