VIDEO NEWS : नगर जिल्ह्याच्या पाण्याची चिंता मिटली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी विसर्गामुळे जायकवाडी ६५.४१ टक्के भरले आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगरमधून आता जायकवाडीस पाणी सोडण्याची गरज नसून, दोन्ही जिल्ह्यांची चिंता मिटली आहे.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिकमधून ७५ टीएमसीवर पाणी विसर्ग जायकवाडीसाठी केला आहे. गंगापूर धरणात ९०.७१ टक्के साठा कायम असून, त्यातून ५१०४ क्युसेकचा, तर दारणात ८९.६४ टक्के साठा कायम करत त्यातून ५३६० क्युसेक विसर्ग आहे.

कडवातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून २९ हजार क्युसेकने पाणी विसर्ग सुरूच आहे.शिवाय २ दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता हा विसर्ग पुन्हा वाढण्याची तीव्र शक्यता आहे. त्यातून जायकवाडीस आवक अधिक होईल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24