अहमदनगर :- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. अहमदनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे हे विजयी झाले.
त्यांनी राष्ट्रवादी – उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा २ लाख ७५ हजार ७१० मतांनी पराभव केला.
शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार तथा सदाशिव लोखंडे यांनी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा १ लाख २० हजार १९५ मतांनी पराभव केला.
नगर मतदारसंघासाठी एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. तर शिर्डी मतदारसंघासाठी एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. रात्री नऊ वाजता अंतिम निकाल घोषित करण्यात आला.
नंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली.
अहमदनगर मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ एप्रिल रोजी मतदान झाले. तर शिर्डी मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात अाले होते