अहमदनगर :- येथील नगर अर्बन बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे एक पथक आज चौकशीसाठी नगरला आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माजी खासदार दिलीप गांधी या बँकेचे अध्यक्ष आहेत. डिसेंबर महिन्यात बँकेची निवडणूक होणार आहे. बँकेच्या कामकाजबद्दल अनेकदा तक्रारी झाल्या होत्या.