अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्ते डॉ.विनय जठार हे (श्रीगोंदा) नागवडे सहकारी साखर कारखाना विरोधात राष्ट्रीय लवादात तक्रार केली असून त्यात त्यांनी अनेक दावे केलेले आहेत.
ही जमीन राखीव वन असताना हे कर्ज वाटप करताना वनसंवर्धन अधिनियम 1980 तील तरतूदींचे भंग झाले आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. लिंपणगाव येथील सर्वे नंबर 99-अ वरील जमीनीचे एकूण क्षेत्र 173.33 हेक्टर (428 एकर 5 गुंठे) असून जून 1892 मध्ये ही जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली.
1930 मध्ये महसूल खात्याने यापैकी 49.39 हेक्टर जमिनीचे तर 1970 मध्ये आणखी 82 एकर अशा तब्बल 120 एकर जागेचे निर्वणीकरण केले. उर्वरीत 308 एकर जागा अजूनही महसुल खात्याच्या ताब्यात आहे. या जागेवर वन (संवर्धन) अधिनियम 1980 च्या तरतूदी लागू होतात.
महसूल खात्याने सर्वे क्रमांक 99 चे दोन गट पाडले असून गट क्रमांक 51 चे क्षेत्र 16.13 हेक्टर तर गट क्रमांक 52 चे क्षेत्र 108.14 हेक्टर आहे. 1960 मध्ये अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी मौजेे लिंपणगाव येथील गट क्रमांक 234 मधील वनविभागाच्या वनजमिनी महसूल सरकारी जमिनी निर्गती नियमाअन्वये
भूमिहिनांना भोगवटादार वर्ग-2 म्हणून कायमस्वरूपी शेतीसाठी वाटप केल्या. 1979 मध्ये यापैकी 36 हेक्टर जमिनीवर जवाहरलाल नेहरू ग्रेट इंडियन बस्टर्ड सेंच्युरी म्हणजेच माळढोक अभयारण्य जाहीर करण्यात आले. याचा विस्तार कर्जत, श्रीगोंदा आणि करमाळा तालुक्यासह नेवाशातील 32 गावांत करण्यात आला.
1985 मध्ये अभयारण्याचा विस्तार सोलापूर जिल्ह्यातील आणखी गावांचा समावेश झाला. 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महसूल खात्याच्या ताब्यातील वन, गायरान जमीनी माळढोक अभयारण्याच्या पुर्नगठणासाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. मात्र, आजवर ती हस्तांतरीत करण्यात आलेली नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved