मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले.

कर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

जोरदार शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी पालकमंत्री शिंदे व भाजपवरील दबाव वाढविला. राऊत म्हणाले, मी साधे पानाचे दुकान चालवत होतो. माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी मला मोठे केले.

पायासाठी दगड जे झाले त्यांचे काय, यासाठीच हा मेळावा आहे. पालकमंत्री शिंदे यांना देखील सांगितले आहे की, 2009 साली जे आपल्यासाठी झटले त्यांचा वार्‍यावर सोडू नका. गेली 25 वर्षे कर्जत-जामखेडमध्ये आमदार कोण, हे ठरविण्याचेे काम केले.

आता किंगमेकर नव्हे, तर स्वतःच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपकडे उमेदवारी मागितली असून, यात गैर काही नाही. त्यांना आठ दिवसांची मुदत देत आहे. विचार झाला नाही तर सर्व पर्याय खुले आहेत. 21 नोव्हेबरला माझा आंतीम निर्णय जाहीर करेल.

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून महाजनादेश यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच त्यांना पुढील मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे सुतोवाच केले.

असे असताना मतदारसंघातील प्रभावी भाजप नेते राऊत यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. त्यासाठी मुलाखत दिली. तसेच सोमवारी कर्जतला मेळावा घेऊन मुठी आवळल्या.

जोरदार शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी पालकमंत्री शिंदे व भाजपवरील दबाव वाढविला. राऊत म्हणाले, मी साधे पानाचे दुकान चालवत होतो. माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी मला मोठे केले.

येथील अक्काबाई मंदिरापासून प्रथम भव्य रेली काढण्यात आली. यामध्ये मोठया संख्येने युवकांसह नागरिक सहभागी झाले होते. संपत बावडकर यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी नगरसेविका मनीषा सोनमाळी, काकासाहेब धांडे, शिवकुमार सायकर, भाऊसाहेब जंजीरे, डॉ.नेटके, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा भैलुमे, प्रदीप टापरे, डॉ. मयूर नेटके, एकनाथ जगताप, समीर पाटील, तात्या माने, मनीषा सोनमाळी, सारंग घोडेस्वार, किरण पावणे, ॲड. महारुद्र नागरगोजे, सावता हजारे, नागेश गवळी यांची भाषणे झाली.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24