भंडारा | दुचाकीने जाणाऱ्या अंगणवाडी सेविकेला दोघांनी रस्त्यात अडवले. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. तिला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला.
ही संतापजनक घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या रेखाटोला ते फुळबोडी गावादरम्यानच्या जंगलात घडली. पीडित अंगणवाडी सेविका ही तिला नेमून दिलेल्या गावातील अंगणवाडीला दुचाकीने जात होती.
सोमवारी सकाळी ती दुचाकीने जात असताना सदर जंगलाचा फायदा घेत दोघांनी तिला वाटेत अडविले. तिला जंगलात ओढत नेऊन अत्याचार केला.
यानंतर तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, एक गुराखी महिला तिथे पोहोचल्याने आरोपींनी पळ काढला.