अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे :- अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष बदलल्याने फितूर झाली होती. मात्र, परिस्थिीतीजन्य पुराव्याचा आधारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी ५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०१३ रोजी मुगाव (ता. पौड जि. पुणे येथे घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन भावांसोबत मुगाव येथे राहत होती.
घटनेच्या दिवशी आई मुलीला तिच्या आजीकडे सोेडून कामाला गेली होती. संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे आईला दिसले. तिच्याकडे विचारपूस केली असता दुपारी तिच्या सोबत घडलेला प्रकार तिने सांगितला होता.