अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी महत्त्वाचे भाष्य केले. न्यायालयाचा निकाल मी वाचलेला नाही, मात्र जे अहवाल आले आहेत
त्याच्यामधून जर न्यायालयाने आर्यन खानची निर्दोष सुटका केली असेल किंवा तशा प्रकारचे विचार व्यक्त केले असतील तर, हे सिद्ध होते की तो निर्दोष आहे.
त्याचबरोबर, या प्रकरणात जर एनसीबीने षडयंत्र केले असले तर, त्याबाबतची माहिती तपासातून पुढे येईल, असे वळसे पाटील म्हणाले क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत.
त्याच्या वॉट्सअॅप चॅटमध्ये कटकारस्थान करण्याचा हेतू असल्याचे आढळून आले नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
यावर गृहमंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर, केंद्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.