महाराष्ट्र

‘एप्रिल फूल डे’ म्हणत पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा राष्ट्रवादीकडून वाढदिवस साजरा

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : आज ‘एप्रिल फूल डे’ चे (April Fool’s Day) निमित्त साधत राष्ट्रवादी (Ncp) युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahboob Sheikh) यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

तसेच हा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला असून याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे, मोहसीन शेख, वीरू वाघमारे, गौतम आगा, सुनील पालवे, नाजीर शेख तसेच अन्य युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान आज शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही सकाळी मोदी सरकारवर समाचार घेतला आहे.

या देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. सरकारने एप्रिल फूल करून टाकलं, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले.

जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत वर्षानुवर्ष एप्रिल फूल सुरू आहे. आता एप्रिल फूल हा गंमतीचा विषय राहिला नाही, एप्रिल फूल हा जगण्या मरण्याचा प्रश्न जनता आणि सरकारमध्ये झाला आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office