कोपरगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतिपदी अर्जुन प्रभाकर काळे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून पंकज चौबळ यांनी काम पाहिले.

तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे या वेळी उपस्थित होते. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे जगधने व काळे यांची बिनविरोध निवड झाली.

आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या वेळी ते म्हणाले, विश्वासाला तडा जाऊ न देता मावळत्या सभापती अनसूया होन व उपसभापती अनिल कदम यांनी चांगले काम केले.

अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीतही बदल घडवला. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या सहकार्याने विकासाचा रथ असाच प्रगतिपथावर ठेवा.

सभापती जगधने म्हणाल्या, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून दिलेल्या संधीचे सोने करू. उपसभापती काळे म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

याप्रसंगी अनसूया होन, अनिल कदम, कारभारी आगवण, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, विमल आगवण, सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पं. स. सदस्य मधुकर टेके,

श्रावण आसने, कैलास राहणे, वर्षा दाणे, सुधाकर रोहम, राजेंद्र मेहेरखांब, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, नगरसेवक मंदार पहाडे आदी उपस्थित होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24