मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही आमदार मुंबईत दाखल झाले आहेत असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
अनिल पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं फेसबुकवरुनच स्पष्ट केलं होतं.
राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 52 आमदार आहेत. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. म्हणजेच केवळ अजित पवार सध्या सोबत नसल्याची माहिती आहे.