राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर ;- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय.

हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्‍यात संघर्ष करावा लागेल.

झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्‍यात राजकीय भूकंप करतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पारनेर बाजार समितीतील राजीनामानाट्याने राष्ट्रवादीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली.

याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत तालुक्‍याच्या राजकारणामध्ये दिसणार आहे, हे निश्‍चित. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर विश्‍वास ठराव दाखल करण्यात आला होता.

तो बारगळला. त्यानंतर गायकवाड यांचे सह्यांचे अधिकार देखील काढून घेण्यात आले होते. त्यादरमानच्या घडामोडी सर्वश्रुत आहेतच.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24