पिता – पुत्र चालतात , मामा – भाचे चालतात . . काका – पुतण्या का नको ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  ;- बहचर्चित महाविकास आघाडीचा महाविस्तार होऊन तीन दिवस उलटूनही अजून खातेवाटपाला मुहूर्त सापडलेला नाही . मंत्रिमंडळातील समावेश न झालेल्यांचे नाराजीनाट्यही शमलेले नाही . त्यातच जिल्ह्यातून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांना डावलल्याची भावना आणखीनच तीव्र होताना दिसते आहे .

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

त्यामुळे आता पिता – पुत्र चालतात . . मामा – भाचे चालतात . . काका – पुतण्या का नको . . असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे . दरम्यान , आ . पवार यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. 

हे पण वाचा :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थक सरपंचाचे पद अखेर रद्द

मात्र , समर्थकांचे त्यावर समाधान झालेले दिसत नाहीत. तेही नाराज आहेत ; पण उघडपणे बोलून दाखवत नाहीत , असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलत आहेत. महाविकास आघाडीचा सर्व मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. कोणतीही जागा कोणासाठीही रिक्त ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणालाही मंत्रिपदाचे ‘गाजर ‘ दाखविले जाऊ शकत नाही.

हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांत मोठे नाराजीनाट्य हे शिवसेनेत घडले आहे. पहिल्याच झटक्यात आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ दिली गेली. त्यातच शिवसेनेच्या कोट्यातून नगरमधील शंकरराव गडाख व प्रहारचे बच्चू कडू यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत धुसफूस वाढली आहे.

हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ झाल्यामुळे काही जणांची संधी हुकली आहे . पित्याच्या जोडी मंत्रिमंडळात दिसली आहे . असे असले, तरी रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्या या यशाची फळ हे मंत्रिपदाने मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र, तसे बिल्कुल घडले नाही.

हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !

महाविकास आघाडीच्या सरकारचा ‘ रिमोट ‘ हा शरद पवार यांच्या हाती असताना देखील नातवाला संधी मिळाली नाही . तसेच , रोहित पवार यांचे काका असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेदेखील रोहितच्या मंत्रिपदासाठी धावून गेले नाहीत ! आ.पवार हे निवडून आल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात निश्चितपणे समावेश होईल , अशी अटकळ बांधली जात होती.

हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…

पालकमंत्रीपदही पुन्हा कर्जत – जामखेडला मिळणार , अशी आस राष्ट्रवादी समर्थक बांधून होते. मात्र , तसे काही घडले नाही घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून साहेबांनी आ . पवार यांना मंत्रिमंडळात संधी दिली नाही , असे बोलले जाते . पण शिवसेनेचे पिता – पुत्र चालतात. राष्ट्रवादीतील मामा – भाचे चालतात . . मग काका – पुतण्या का चालत नाही , अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसमधून व्यक्त करण्यात – येत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24