शरद पवार यांच्या हत्येचा कट ? पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्यासह वेब पोर्टल विरोधात तक्रार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजी​नगर पोलीस ठाण्यात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेब पोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली. 

ही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात असल्याचे खांबिया यांनी म्हटलंय. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या युट्युब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोरेगाव भिमा दंगलीचे खरे सुत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करत, हे प्रकरण गंभीर असल्याचंही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर आणि इतरांकडून सातत्याने युट्यूब, पोस्टमन पोर्टल आदी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24