अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- पार्किंगमधील वादातील किरण काळे यांचे वैयक्तिक मत स्पष्ट असतांना या वादात राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर नाहक आरोप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, श्री.खोसे यांनी ना.थोरात यांच्या संदर्भातील ती भावना दुखावणारी वक्तव्य मागे घ्यावी व आघाडीचा धर्म पाहावा, असे आवाहन अहमदनगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आणि पदाधिकारी यांनी केले आहे.
श्री.खोसे यांनी एका वृत्त वाहिनीवर या संदर्भात प्रतिक्रिया देतांना त्यांनी ना.थोरात यांच्यावर आरोप केले होते. त्याला प्रतित्युतर शहर काँग्रेसने प्रसिद्धीला दिले.
त्यात ते म्हणतात, नामदार थोरात यांच्यावर बेछूट आरोप काँग्रेस कार्यकर्ते कधीही सहन करणार नाही, असा इशारा ही भुजबळ यांनी दिला असून, शहर काँग्रेसची ही भुमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पदाधिकारी सर्वश्री अॅड.आर.आर.पिल्ले, फिरोज शफी खान, शामराव वाघस्कर, अभिजित कांबळे, अज्जूभाई शेख, शशिकांत पवार, सौ.सविता मोरे, रवी सूर्यवंशी,
मुकुंद लखापती, एम.आय.शेख, मार्गरेट जाधव आदिंनी ना.थोरात यांच्यावरील आरोपाबाबत नाराजी व्यक्त केली. श्री.काळे यांचे आणि एनसीपी नेत्यांमधील वाद जुना व वैयक्तिक आहे.
या वादात काँग्रेस पक्षाला गृहित धरु नये, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शहर काँग्रेस पक्षाने पक्षनिष्ठा जपत आघाडीचा धर्मही पाळला आहे.
आघाडी असेल तेव्हा एकत्र आणि नसेल तेव्हा विरोधाची भुमिका घेतली आहे, पण त्यामागे पक्षादेश आणि निष्ठेला महत्व दिले आहे, काँग्रेसने हीच शिकवण दिली आहे.
नगर मधील सर्व काँग्रेसजनांना ना.थोरात यांची हीच शिकवण आहे, म्हणून पक्षाचे जुने-नवे आघाडीबरोबर आहे, पण जर ना.थोरात यांच्यावर नाहक आरोप होत असेल तर आघाडीपेक्षा पक्ष व ना.थोरात यांना आम्ही महत्व देतो व देणार आहे.
ना.थोरात आणि काँग्रेस पक्षावर आरोप करणे ही कृती योग्य नाही तरी श्री.खोसे यांनी आपले ना.थोरात यांच्या संदर्भातील वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, असे श्री.भुजबळ यांनी सूचविले
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved