अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देश म्हणुन एकत्र येऊन लढा द्या. पंतप्रधानांनी केलले आवाहन हे देशवासियांचे मनोबल वाढवणारे आहे. संकटातून बाहेर पडल्यावर त्यांचे आवाहन योग्य की अयोग्य यावर चर्चा करता येईल. यावर मत मतांतराची गरज नाही, असे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, नागरिकांनी रविवारी 9 वाजता दिवे बंद करावे. मात्र मेन स्विच मात्र बंद करू नये. घरातील इतर उपकरणे सुरू ठेवा. 1700 मेगावॅट घरगुती विजेचा वापर आहे. एवढा लोड अचानक कमी झाल्यास त्यावरील उपाययोजनेस राज्य सरकार तत्पर आहे.
औष्णिक विज निर्मीतीचा भार हायड्रो प्रकल्पावर टाकणार आहोत. औष्णिक विज निर्मीती लगेच बंद करता येत नाही. रात्री नऊ वाजता राज्यातील विज सुरूच राहणार आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. राज्यसरकारने त्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com