राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्याचा डाव; माजी मंत्र्यांचा हल्लाबोल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कोरोना महामारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून रुग्णांना बेड मिळत नाहीत. हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार सांगतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. कॅप्टन बाहेर फिरत नाहीत आणि त्यांना बाहेर फिरू देखील देत नाही.

शरद पवार स्वत: या वयातही फिरून राष्ट्रवादी वाढविण्याचे काम करत आहेत. यामागे शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली.

कोरोना महामारी रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे सांगत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी सरकारवही हल्ला चढविला आहे.

नगर तालुक्यातील खडकी, खंडाळा, हिवरे झरे, बाबुडी बेंद येथील २८१ शेतकर्‍यांना खेळते भांडवलचे चेक वाटप कार्यक्रम खडकी येथील एडीसीसी बँकेच्या शाखेत झाला.

यावेळी कर्डिले बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24