ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही ! ओबीसी आंदोलनकर्त्यांना आश्वासन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : ओबीसीच्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि त्यांचे आरक्षण कमीदेखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात दिली. 

सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघांच्या वतीने नागपुरात संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शनिवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले.

ओबीसी प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज संभाजीनगर येथील उपोषणकर्त्यांचीही भेट घेतली. ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही किंवा यात नवीन वाटेकरी येणार नाही, ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे.

मराठा समाजाची जी अपेक्षा आहे, ती आपण मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिले होते, ते परत मिळावे, ही आहे. यासाठी ‘क्युरेटिव्ह’ याचिका दाखल करण्यात आली आहे. न्या. भोसले समितीने सुचवलेल्या उपाययोजनासुद्धा हाती घेण्यात आल्या आहेत.

आता न्यायमूर्ती शिंदे समिती गठित करण्यात आली आहे. ज्यांचे मत आहे की, ते आधी कुणबी होते आणि त्यांना नंतर मराठा ठरवण्यात आले, त्याची तपासणी करण्यासाठी ही समिती आहे.