अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येचं गूढ निर्माण झालं असून त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रानं काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
सिद्धार्थ पिठानी नावाचा सुशांतचा मित्र त्याच्यासोबतच राहत होता. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सुशांतनं आत्महत्या केलेल्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
‘ज्या दिवशी सुशांतनं आत्महत्या केली त्या दिवशी सुशांत नेहमीप्रमाणं शांतच होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही एकत्र जेवणही केलं. जेवताना आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर आपापल्या खोलीत झोपायला गेलो.
त्यानंतर रात्री एक वाजता सुशांत माझ्या खोलीत आला होता. त्यानं मला मी अजूनही झोपला का नाही असं विचारलं. त्यानंतर मी त्याला त्याच्या बेडरुममध्ये सोडून आलो.
त्यानंतर सकाळी घरातल्या शेफनं त्याच्या रुमचा दरवाजा वाजवला, पण सुशांतन काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी आमच्या काही मित्रांना याबद्दल कळवलं.
चावी वाला आल्यानंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा सुशांतनं गळफास घेतल्याचं समोर आलं, असं सिद्धार्थनं सांगितलं आहे. सिद्धार्थ हा सुशांतचा क्रिएिव्ह कंटेन्ट मॅनेजर काम पाहायचा.
तो सुशांतच्या घरातच राहत होता. घरात असूनही त्याला यासंदर्भात काहीच कसं समजलं नाही… असे अनेक प्रश्न सध्या त्याला विचारण्यात येत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com