महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. १: संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता,प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक  सुबोध कुमार जायसवाल तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24