सिंधुदुर्ग, दि. 01 : महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री व मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ध्वजवंदन करण्यात आले.