महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

परभणी दि. 1 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60वा वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24