महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, गृह शाखेचे नायब तहसीलदार रवि मोरे आदी उपस्थित होते.

यानिमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या व कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण एकजुटीने बाहेर पडू, असा विश्वासही व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात संपन्न झाला.

अहमदनगर लाईव्ह 24