मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. १: महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 

या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी राजीव निवतकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर,  उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Live Updates