महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पालघर, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभूवन, पोलीस अधीक्षक गौरव सिंह उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24