जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

या ध्वजारोहण समारंभाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्राताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचे हे निर्देश पाळत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24