आगीत घरांचे नुकसान झालेल्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे वाटप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नाशिक, दि. 2 मे (जिमाका) : नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत येथील 116 घरांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नागरिकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येऊन प्राथमिक स्वरूपात तीन नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात लागलेल्या भीषण आगीत 116 घरांचे मोठे नुकसान झाले. या सर्व नागरिकांना शालिमार येथील बिडी भालेकर शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची मदत करण्यात येत आहे.

आज  छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रत्येकी 5 हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त 116 नागरिकांना या धनादेशाचे वाटप करण्यात आले असून त्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24