शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे – रोहित पवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत :- शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. तेच हक्काचे पाणी आपल्याला आणायचे आहे, असे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी सांगितले. प्रेरणा दौऱ्याची सुरुवात सिद्धटेकच्या सिद्धिविनायकापासून करताना पवार बोलत होते.

राशीन येथील यमाई देवी, काशीविश्वेश्वर मंदिर, कर्जत येथील आक्काबाई मंदिर, गोदड महाराज मंदिर, अंबीजळगाव येथील संत सावतामाळी मंदिर, शेगुड येथील खंडोबा मंदिर, चोंडी येथील अहिल्यादेवी जन्मस्थान, जवळा येथील जवळेश्वर मंदिर, नान्नज येथील नंदादेवी मंदिर, धनेगाव येथील धाकटी पंढरी, खर्डा येथील संत गितेबाबा समाधी,

संत सिताराम गड, भुईकोट किल्ला, जामखेड येथील पीरबाबा दर्गा, अण्णा भाऊ साठेनगर, लोहारदेवी मंदिर, जैन मंदिर, मिरजगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ, मांदळी येथील आत्मारामगिरी महाराज येथे सपत्नीक भेट देऊन पवार यांनी आशीर्वाद घेतले. ग्रामस्थांशी चर्चा करत अडचणी जाणून घेतल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24