पारनेर :- विधानसभा मतदार संघात तीन वेळेस आमदार असलेले शिवसेनेचे विजय औटी व शिवसेनेतून हकालपट्टी केलेले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आलेले नीलेश लंके यांना पर्याय म्हणून सुजीत झावरे पाटील यांनी पारनेर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
पारनेर मध्ये असलेली हुकूमशाही व गुंडशाही मोडीत काढण्यासाठी शिवसेनेचे औटी व राष्ट्रवादीचे लंके नको असे सागंत पारनेर नगर मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस व भाजपाच्या अनेक नाराज मातब्बर नेत्यांची एकत्रित मोट बांधत
व स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या अनेक जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा सुजित झावरे यांच्या मागे असलेला संच तालुक्यात केलेल्या विविध विकास कामाच्या बळावर सुजित झावरे यांनी पारनेर तालुक्यात आता तिसरी आघाडी तयार केली आहे.
यामध्ये सुजित झावरे यांच्या बरोबर शिवसेनेचे नाराज जि. प. सदस्य संदेश कार्ले, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प.सदस्य माधवराव लामखडे, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ यांची साथ असणार आहे.
तर अजूनही काही नाराज मोठे नेते या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. तर पारनेर तालुक्यातील इतर पक्षातील मातब्बर नेत्यांचा झावरे यांना असलेला उघड पाठींबा आणि आघाडीला जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा आशिर्वाद असल्याचीही चर्चा तालुक्यात आहे.
यामुळे पारनेरची दुरंगी वाटणारी ही लढत आता तिरंगी होणार आहे. त्यामुळे आता पारनेरच्या राजकारणात सुजित झावरे यांनी मोठा उलटफेर केल्याने राजकीय गणिते बदली आहेत.
सुजित झावरे पाटील यांनी तालुक्याच्या प्रमुख पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना चेकमेट केल्यामुळे निकाल हा धक्कादायक लागण्याचे संकेत मिळत आहेत.
पारनेर नगर मतदारसंघातील नगर तालुक्यातील दिग्गज नेते जि.प.सदस्य संदेश कार्ले, जि.प.सदस्य माधवराव लामखडे,जि.प.सदस्या सुप्रियाताई झावरे पाटील, जि.प.सदस्य शरदराव झोडगे, जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ,
नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, पंचायत समिती सदस्या सुप्रियाताई साळवे, बाजार समीती संचालक गंगाराम बेलकर, राजेश भंडारी, राहुल जाधव, निवृत्ती वरखडे, बाळासाहेब माळी सभापती बापूसाहेब भापकर,सभापती अरूणराव ठाणगे,
पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबाशेठ खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्या सह पारनेर तालुक्यातील प्रमुख नेते अनेक सुजित झावरे समर्थक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते.
या तिरंगी लढतीत झावरेंनी नाराज नेत्यांची मोट पक्की बांधून ठेवल्यास धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.