हमारा माता पिता जैसा खयाल रखा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वर्धा, दि 3 (जिमाका) – लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतली.

केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रावासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा  या कामगाराने  व्यक्त केली.

लखनऊला जाणारी रेल्वे गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून आाज सायंकाळी 6 वाजता सुटली. यामध्ये वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या 220 कामगारांना आज विशेष बसगाड्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचवण्यात आले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधिक्षक बसवराज तेली, मुख्य कार्याकारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ सचिन पावडे, प्रदीप बजाज  यांनी नवजीवन छात्रावास येथे कामगारांना निरोप दिला. यावेळी काही कामगारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन आम्ही जात आाहोत आाणि हा पाहुणचार आमच्या कायम लक्षात राहील. या जिल्ह्याची ही खासियत आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगू असे श्री वर्मा यांनी सांगितले.

परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर आपले वर्धेत पुन्हा स्वागत – जिल्हाधिकारी

यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कामगारांना स्वस्थ आरोग्याच्या शुभेच्छा देताना परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर या जिल्ह्यात आपले पुन्हा स्वागत करू.

तुम्ही ग्रीन झोनमधून जात असल्यामुळे प्रवासात सामाजिक अंतर व  स्वच्छतेची काळजी घ्या. नागपूरहून निघणारी गाडी आपल्याला लखनऊला सोडेल.

पुढे उत्तर प्रदेश सरकार तुम्हाला तुमच्या गावापर्यंत पाहेचवेल. प्रवास लांबचा असल्यामुळे काळजी घ्यावी. पोहोचल्यावर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन सुरक्षित असल्याचे कळवा असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवजीवन छात्रावास येथे कामगारांची काळजी घेणा-या सर्व व्यक्तींचे टाळया वाजवून आभार व्यक्त मानले.

11 गाडयामध्ये 220 प्रवासी

जिल्हयात आर्वी, आष्टी,हिंगणघाट, देवळी, सेलू, आणि वर्धा येथील कामगारांसाठी आज 11 गाडया पाठविण्यात आल्या. यामध्ये हिंगणघाट 60 कामगार, आवी- आष्टी 30, देवळी 40 सोबत 3 लहान मुले, सेलू 9, वर्धा 81 कामगारांचा समावेश होता.

यासाठी आर्वी येथून 2 गाडया, हिंगण्घाट 2, देवळी 2 आणि वर्धा 5 गाडया एकावेळी पाठविण्यात आल्यात. वर्धा शहरात आय. टी. आय. टेकडीवरील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेले 33, नवजीवन छात्रावास 15, बच्छराज धर्मशाळा 9, न्यू इंग्लीश हायस्कुल 7 , बापुराव देशमुख सुतगिरणी 17 येथील कामगारांचा समावेश होता.

यावेळी जिल्हा प्रशासनाने आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, आणि वर्धा येथील कामगारांसाठी गाडयांची व्यवस्था केली. यामध्ये उत्तम गलवा तसेच सचीन अग्नीहोत्री आणि दत्ता मेघे यांच्या शैक्षणिक संस्थांनी गाडया उपलब्ध करून दिल्यात.

जाणा-या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व कामगारांचे संमती पत्र घेण्यात आले.

नायब तहसिलदार राजेंद्र देशमुख यांनी नागपूर येथे जावून सर्व कामगारांचे प्रवासाचे तिकीट काढले. ज्यांच्याजवळ तिकीटाचे पैसे नव्हते त्यांना सामाजिक संस्थांनी तिकीटाचे पैसे सुद्धा दिलेत.

अहमदनगर लाईव्ह 24